पेरु देशामध्ये नव्या नियमाची अंमलबजावणी
वृत्तसंस्था/ लिमा (पेरु)
कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे देश विविध उपाय योजना करत आहेत. या उपाययोजनांची चर्चाही होत आहे आणि तिचे अनुकरणही अन्य देशांमध्ये होत आहे. पेरु या देशाने अनोखा नियम केला आहे. खरेदीसाठी बाहेर पडण्याकरता आता सम-विषम फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार पुरुष आणि महिला एकत्र बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांना एकाआड एक दिवस स्वतंत्रपणे जावे लागणार आहे. आजपासूनच हा नियम अंमलात आणला असून 15 एप्रिलपर्यंत त्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
पेरुचे राष्ट्रपती मार्टिन व्हिजकारा यांनी या नियमाची घोषणा केली आहे. पेरुमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 1414 केसेस समोर आल्या असून 55 जणांचा मृत्यु झाला आहे. नव्या नियमानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी कोणत्याही कामासाठी फक्त पुरुष जाऊ शकतील तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी महिलांनाच खरेदसाठी बाहेर पडता येणार आहे.या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणाऱयांना कडक शिक्षा करण्याची तरतूद केल्याचही राष्ट्रपती व्हिसकारा यांनी स्पष्ट केले.