प्रतिनिधी / पणजी
खर्रेवाडे सुकुर येथील श्री वेताळ देवस्थानचा पंधरावा वर्धापनदिन व 59 वा नाटय़महोत्सवानिमित्त दि. 4 रोजी ते दि. 8 रोजीपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 4 रोजी वर्धापनदिनानिमित्त सकाळी 9 वा. पासून विविध धार्मिक विधी, आरती व तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायं. 6.30 वा. दिवजोत्सव व नंतर श्रींची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक, आरती व पावणी होईल. दि. 5 मार्च रोजी सायं. 4 वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व सायं. 7.30 वा. तीन चोक तेरा हा विनोदी नाटय़प्रयोग होईल. दि. 6 रोजी सकाळी 10 वा. सत्यनाराण महापूजा व सायं. 7,30 वा. गीतासार या विषयावर सूरज चोडणकर यांचे प्रवचन होणार आहे. रविवार दि. 7 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी व सायं. 7 वा. पासून पुरूष व महिलांसाठी खुली अखिल गोवा एकेरी गौळण गायन स्पर्धा होणार आहे. श्री वेताळ देवस्थान व सम्राट क्लब म्हापसातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी व सायं. 7 वा. गावातील लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. सर्व कार्यक्रम व स्पर्धा ही श्री वेताळ देवस्थानच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.