प्रतिनिधी /फोंडा
खांडेपार येथील शांतादुर्गा मंदिर परिसराजवळ रानटी जनावरांना अडकवण्यासाठी लावलेल्या फासात अडकलेल्या म्हशीची सुखरूप सुटका येथील ग्रामस्थांनी प्राणिमित्रांच्या सहाय्याने केली. सदर घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
फेंडा भागात सद्या रानमळे फुलु लागलेले आहे. आपल्या पिकांच्या संरक्षणांसाठी काही ठिकाणी जंगली जनावरांना अडविण्यासाठी केबलच्या सहाय्याने फासे मांडण्यात येत असतात. ओहोळाच्या शेजारी चरत असताना अशाच एका फाशांत म्हैस अडकली. केबलपासून सुटका करण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. सदर प्रकार काही ग्रामस्थांच्या नजरेस पडल्यानंतर कुर्टी येथील प्राणिमित्रांच्या सहाय्याने तिची केबलपासून सुटका करण्यात आली. त्यानंतर तीच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. याकामी भानुदास नाईक, आनंद जल्मी व आदर्श जल्मी यांनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या पाळीव जनावरांची जबाबदारी मालकांनी घ्यावी. म्हशीच्या गळय़ात टॅग नसून अजूनपर्यंत कुणीच तिच्यावर मालकीचा दावा पेलेला नाही. भटक्या गुरांची जबाबदारी पंचायतीने घ्यावी अशी मागणी भानुदास नाईक यांनी केली.