अज्ञातांनी लोखंडी खिडकी तोडून घेतला प्रवेश : घरात कुणीच नसल्याचा साधत किमती दानिगे, भांडय़ासह पसार.चोऱयाचा तपास लावण्यात फोंडा पोलीस अपयशी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा-बेळगांव महामार्गावरील ओपा रोड खांडेपार जन्क्शनजवळील सॉ मिल परिसरातील एका घरात धाडसी चोरी झाल्याची घटना काल रविवारी सकाळी 11 वा. सुमारास उघडकीस आली. अज्ञात चोरटय़ानी अंदाजे 8 लाखांच्या सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य पळविले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळावर पंचनामा केला आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार विठ्ठल मणेरीकर यांने याप्रकरणी रितसर तक्रार स्थानकात दाखल करण्यात आली आहे. चोरी झालेल्या घरात मणेरीकर कुटूंबिय आपल्या वयस्क आई, पत्नी व दोन मुलांसह राहत आहे. शनिवारी सायंकाळी मणेरीकर कुटूंबियांनी पत्नीच्या माहेरी जाण्याचा बेत केल्यामुळे वयस्क आईला वडाकडे उसगांव येथील आपल्या नातेवाईकांकडे 5 वा. सुमारास पोचविले होते.त्यानंतर आपल्या चारचाकीसह इतर चारजण पंचवाडी येथे गेली होती. खबरदारीपोटी घरातील लाईट पेटवून ठेवली होती. तरीही चोरटय़ांनी डाव साधला अज्ञात चोरटय़ानी घरात प्रवेश घेताना तळमजल्यावरील हॉलच्या खिडकीची लोखंडी ग्रील उखडून काढली. आतून खिडकी बंद केली नसल्याने सहज प्रवेश घेतला. बॅडरूमचा दरवाजाही खुला होता. चोरटयानी सरळ प्रवेश बॅडरूममध्ये घेत कोणत्याही कपाटाची नासधूस न करता लहान मुलांच्या कपडय़ाच्या घडीत ठेवलेले सोन्याचे दागिने पळविले. सर्व कपडे रूमभर पसरविलेले होते. त्यानंतर स्टोअररूमधून दोन मोठी भांडी (अल्युमिनीयम तोप) व तांदूळ घेऊन चोरटे पसार झाले.
सदर घटना शनिवारी रात्री 10 वा. दरम्यान घडल्याचा संशय असून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात दोघांजणाचे चेहरे बंदिस्त झालेले आहेत. तसेच घरकामासाठी येणारी बाईकडेही उलटतपासणी करण्यात आलेली आहे. चोरटय़ानी घरातील अंतर्गत खोल्याची अचूक माहिती कशी होती? किंवा ती आणखी कोणत्या सुत्रधारांनी पुरविली? यादिशेनही तपास सुरू आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरटयानी इतर कोणत्याही रूममध्ये किंवा पहिल्या मजल्यावरही कोणतीच हानी केलेली नाही त्यामुळे चोरटे परिचयाचे असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सविस्तर माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ करीत आहे.
पाळीव कुत्रा नसल्याने चोरटय़ांनी केले धाडस
मणेरीकर कुटूंबियापैकी पती-पत्नी कामाला असून दोन्ही लहान मुलांसह वयस्क आई सकाळच्या सत्रात घरात असते. चार वर्षापुर्वी त्याच्या घरात एक पाळीव कुत्रा होता. तो वारल्यानंतर त्याची उपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. त्यावेळी कुणा अनोळखींना घरी येण्याचे धाडस होत नव्हते. तसेच सदर परिसरात दोन घरे बंदावस्थेत असतात. यासर्व परिसराची रेकी केल्यानंतरच चोरीचा बेत आखला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून घटनास्थळावर पंचनामा केला असून उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे.
फोंडय़ात चोरांचा सुळसुळाट, फोंडा पोलीस मात्र निवांत
मागील काही दिवसापासून फोंडा शहर परिसरात दुचाकी चोरटय़ाची टोळी सक्रिय झाली असून वाहतूक व खाकी पोलिसांना चकमा देत दिवसाढवळय़ा मार्केट परिसरात पार्क केलेल्य़ा दुचाक्या चोरटय़ानी पळविल्य़ा होत्या. त्यानंतर दिवसाढवळय़ा फ्लॅटात चोरी करून चोरटे पसार झाले होते. आणि आता फोंडा बेळगांव महामार्गावरील एका घरात चोरीची घटना घडल्याने फोंडा पोलिस केवळ गाडयावर मटका साहित्यसह थाण मांडलेल्यांना अटक करून शेकी मिरवताना दिसत आहे. वारखंडे व हवेली कुर्टी, बुधवार पेठ, कुडतरनगरी येथे दिवसाढवळय़ा चोरटे वावरत आहेत. पोलीस केवळ गोवा बागायतदाराजवळ चलन फाडण्यात मग्न असतात काय असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फोंडा तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी एकही कॅमेरा चालत नसल्याने वाढत्या चोरीच्या प्रकारामुळे पोलिसही हतबल झालेले आहेत.