वार्ताहर / माशेल
लॉकडाऊनमुळे लईराई देवीचा जत्रोत्सव यंदा साजरा होणार नसल्याचे खांडोळा भागातील धोंडगणांनी व्रत व सामुहिक भोजन शारीरिक अंतर राखीत आपल्या घरीच केले. जत्रोत्सवात सहभागी होऊन यंदा होमकुंडातील अग्नीदिव्यात सहभागी होता येत नसले तरी घरीच बसून देवीची पुजाअर्चा व भक्तीभावाने नामस्मरण केल्याचे धोंडगणांनी सांगितले.
जत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला खांडोळातील हे धोंडगण एकत्र येऊन सामुहिक व्रत व भोजन करायचे. गावातील इतर लोकांनाही देवीचा प्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केली जायची. यंदा हे जेवण त्यांना एकत्रितपणे न करता घरीच करावे लागले आहे. धोंडगणांनी त्याच उत्साहात आपल्या घरीच व्रत सोहळे पाळून जेवण केले. काल मंगळवारी जत्रोत्सव असल्याने त्यांनी लईराई देवीला मोगऱयाच्या माळा अर्पण करून पूजा केली. दुपारी फराळ घेतला असे सुनील गांवकर, ज्ञानेश्वर जल्मी व शैलेश गांवकर या धोंडगणांनी सांगितले.