प्रतिनिधी / कोल्हापूर
खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक भरतीसाठी असलेली पवित्र पोर्टल प्रणाली बंद आहे. ती सुरू करुन खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक भरतीस परवानगी द्या, या मागणीचे निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयासंदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर बंद असलेली पवित्र पोर्टल प्रणाली सुरू करूण लवकरच शिक्षक भरतीचा निर्णय घेतला जाईल. खाजगी प्राथमिक शाळांना आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच टप्पा अनुदानित शाळांना पुढील टप्पा अनुदान देण्यास शासन बांधील असलेचेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या भरतीसाठीचे निवेदन अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनाही देण्यात आले. यावेळी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, शरद केनवडे, सुनील कारंजकर,वैभव, कांबळे आदी उपस्थित होते.