विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
सहकारी विभागाने 1 महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सोळा सावकारांच्या मुसक्या आवळा होत्या. त्यानंतर आज, मंगळवारी पन्हाळा, करवीर तालुक्यातील सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील सज्जन बळीराम पाटील यांच्या जयसिंग मेडिकल, जयसिंग ज्वेलर्स, सुवर्ण बला व्यापारी पतसंस्था व त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. त्याचबरोबर करवीर तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तर, उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू होती. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या पथकांमध्ये पन्हाळ्याचे सहायक निबंधक शिरीष तळकेरे, के. एल. ठाकरे, माधुरी कुंभार, एस .बी. नाईक, आनंदा आरडे, रंगराव पाटील आदींचा समावेश होता.