प्रतिनिधी /पेडणे
खाजने – अमेरे- पोरसकडे पंचायत आयोजित गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात, विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि मासे काढणे स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
वेशभूषा स्पर्धेत वरिष्ट गटांत कु. पुनीत मनोहर तळवणेकर प्रथम तर कु. श्रीशा साहिल कळगुटकर कनिष्ट गटांत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे- वरिष्ट गट द्वितीय कुमारी सिया खाजनेकर, तृतीय कुमारी श्रुतिका रेडकर, उत्तेजनार्थ कुमारी स्वरा खाजनेकर, व कुमारी आचल गडेकर तर वरिष्ट गटांत द्वितीय कु प्राची पेडणेकर, तृतीय कु. लक्ष खाजनेकर तर उत्तेजनार्थ कुमारी श्रुतिका खाजनेकर.
यंदा गोवा मुक्तिदिन हीरक महोत्सव औचित्य साधून खाजने-अमेरे-पोरसकडे पंचायतीतर्फे माजी सरपंचाचा सत्कार करण्यात आला. बक्षीस व सत्कार समारंभावेळी व्यासपीठावर सर्व सत्कारमूर्ती सरपंच ग्लॅन्सी फर्नांडिस, उपसरपंच रॉष पेरेरा, पंच सदस्य नीता मावळणकर, सत्यभामा पेडणेकर, सत्यवान गावकर, पद्मनाभ आसोलकर व पंचायतीचे सचिव मकरंद पालव आदी उपस्थित होते.