प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. अनुदान त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने ज्यांची खाती नाहीत त्यांनी ती उघडण्यासाठी शनिवारी सकाळी बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयात तोबा गर्दी केली.
200 ते 300 लोकांनी रांगा लावल्या आहेत. पोस्ट विभागाने जास्त काउंटर सुरू करून लवकर खाते काढून देण्याची सुविधा केली होती. परंतु एकदाच गर्दी झाल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.