फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारीचा समावेश ः वाढीसोबत आयात 9.84 लाख टनावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची खाद्यतेलाची आयातही फेब्रुवारी महिन्यात 23 टक्क्यांनी वाढून 9,83,608 टनावर पोहोचली आहे. रिफाइंड पामतेलाच्या आयातीमध्ये मोठी वृद्धी झाली आहे. सॉल्वेंट एक्सट्रक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) यांनी ही माहिती दिली आहे.
मागील वर्षात याच समान महिन्यात खाद्यतेलाची आयात 7,96,568 टन राहिली होती. एसईए यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2021 महिन्यात 8,38,607 टन आयातीच्या तुलनेत यावेळी वनस्पती तेलांची आयात ही एकूण 10,19,997 टन राहिली आहे.
एकूण वनस्पती तेलाची आयात
खाद्य तेलाच्या आयातीमध्ये फेब्रुवारी 2021 च्या 7,96,568 टनाहून वधारुन यावेळी 9,83,608 टन आकडा झाला आहे. रिफाइंड पामतेलाची आयात 6,000 टनाहून वाढून 3,02,928 टन राहिली आहे.
तेलाची आयात या देशांकडून
इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडून भारत पामतेल प्रामुख्याने आयात करतो. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेटीना आणि ब्राझीलमधून आयात करतात.
रशिया-युक्रेन युद्धाचा प्रभाव
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुर्यफूल तेलाचा पुरवठा प्रभावीत झाला आहे. तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये जवळपास 1,52,000 टन सुर्यफूल तेल भारताने आयात केले. मार्चमध्ये यावर परिणाम होणार असल्याचे समजते. मालवाहतूक करणारे जहाज हे भारतीय बंदरावर पोहाचणार असून ते युद्धाच्या अगोदर निघाले आहे, अशी माहिती एसईए यांनी दिली आहे.