खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयात गेल्या दोन-तीन महिन्यात मनोरुग्ण व्यक्तींची संख्या वाढली आहे. खानापुरातील शिवस्मारक चौक परिसरात दोन पुरुष व एक महिला असे तीन मनोरुग्ण दिवसभर भटकत असताना दिसतात. त्यापैकी एकजण गेल्या दोन दिवसापासून कृषी पत्तीन बँकेच्या परिसरात अत्यवस्थ परिस्थितीमध्ये दिसून आल्याने खानापुरातील समाजसेवकांनी यावर हाक दिली असता, खानापूर येथील कदंबा फाउंडेशनच्या पदाधिकाऱयांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्या मनोरुग्ण व्यक्तीला एका रिक्षाद्वारे खानापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या अनुभवी सेवेबद्दल उपस्थितातून कौतुक होत आहे. याकामी कदंबा सोशल फाउंडेशनचे प्रमुख जॉर्डन गोन्साल्विस एम. जी. कुमार, महादेव काद्रोळकर, पिंटू सुतार आधी कार्यकर्त्यानी प्रयत्न हाती घेतले
खानापुर परिसरात मनोरुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेद्वारे खानापूर स्थानकात उतरुन ती परिसरात हिंडत, भटकंती करत आपली उपजीविका भागवतात. रस्त्याच्या कडेला आपला दिवस घालवत असतात. गेल्या दोन महिन्यापासून शिवस्मारक चौकात एक 65 ते 70 वषीय मनोरुग्ण व्यक्ती पायाने सदृढ नसल्याने तो रस्त्यावरून घसरत पुढे जातो तो आपले गाव यमकणमर्डी असल्याचे सांगतो पण तो गावी जाण्यास अथवा पत्ता देण्यास नाकारतो. तर आणखी एक व्यक्ती भाषेने सदृढ असला तरी दिवसभर हात पसरत चौकात फिरत असतो, शिवाय एक तामिळ महिला गेल्या सहा महिन्यापासून खानापूर परिसरात वावरताना दिसते.
गेल्या सहा महिन्यापूर्वी आणखी एक मनोरूग्ण महिला पारिश्वाड रस्त्यावर अपघातामध्ये ठार झाली होती. त्यावेळी देखील या कदंबा सोशल फाउडेशनच्या पुढाकाराने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. खानापूर कृषी पत्तीन बँकेच्या परिसरात विव्हळत पडलेला 50 वषीय पुरुष एकदम व्यवस्थित पडला होता. गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या थंडी पाऊस वाऱयामुळे त्याची प्रकृती अत्यंत बिघडल्याने त्याच्यावर उपचार होणे गरजेचे होते. याबाबत व्हॉट्सऍपवरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर मनोरुग्ण व्यक्तीच्या संदर्भात प्रशासनाने दखल घ्यावी, अशी विनंती केली. परंतु तालुका प्रशासनाने यावर कोणतीही हालचाल न करता अशा बाबीकडे दुर्लक्ष केले. अखेर कदंबा सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱयांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्या मनोरुग्ण व्यक्तीला खानापूर येथील शासकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
उर्वरित त्या मनोरुग्णांची ही दखल घेणार जॉर्डन गोन्साल्विस
खानापूर शहर परिसरात आणखी दोन पुरुष व एक मनोरुग्ण महिला दिवसभर फिरत असतात. त्यांचीही परिस्थिती गंभीर असून पावसाळी वातावरणात त्यांच्याही जीवाला धोका आहे. यासंदर्भात तालुका तहसीलदार यांच्याकडे सदर मनोरुग्णांच्यावर उपचार करून त्याला सुरक्षितस्थळी दाखल करावे, अशी विनंती केली. परंतु तालुका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, यामुळे आता त्या मनोरुग्णांची आपल्या कदंबा सोशल फाऊंडेशनच्यावतीने मच्छे येथील निर्वासित केंद्रात दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांनी दै.तरुण भारतशी बोलताना सांगितले.