करंबळ क्रॉसवरील पाटील गार्डनमध्ये दुपारी 3 वाजता कार्यक्रम : आरक्षणापूर्वीच मोर्चेबांधणीला आलाय ऊत
वार्ताहर / चापगाव
खानापूर तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या चुरशीने निवडणुका पार पडल्या. पैशाची मोठय़ा प्रमाणात उधळण झाली. अन् आपल्या मर्जीतीत निवडून आलेल्या सदस्यालाच अध्यक्ष, उपाध्यक्ष करण्यासाठी आता पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तालुक्मयातील ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या आरक्षणाची लॉटरी आज दि. 21 रोजी खानापुरातील पाटील गार्डनमध्ये दुपारी 3 वाजता काढण्यात येणार असल्याने आरक्षणाच्या लॉटरीकडे तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांसह जनतेचेही लक्ष लागले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या लॉटरीसाठी तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या ठिकाणी केवळ नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रत्येक सदस्यांनी येताना आपले ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे केले आहे. शिवाय कोरोनाच्या धास्तीमुळे सॅनिटायझर व तोंडावर मास्क घालून येणे बंधनकारक करण्यात आले असून गर्दीवरही नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी तसे निर्देश दिले आहेत.
लॉटरी तीस महिन्याच्या कालावधीसाठी
ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक पदासाठी होणारी ही लॉटरी आगामी तीस महिन्याच्या कालावधीसाठी राहणार आहे. त्यामुळे अनेकानी आपल्याच गटाला आरक्षण येणार यासाठी चंग बांधला आहे. 1993 पासून पंचायतराज कायद्यानुसार ग्राम पंचायतीच्या आलेल्या आरक्षणाचा मागावा लक्षात घेता तसेच पंचायतराज खात्याच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्ग सूचीप्रमाणे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे अनेकवेळा सामान्य महिला अथवा सामान्य गटातून अध्यक्ष उपाध्यक्षपद आलेल्या पंचायतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कारण अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय वर्ग या गटात लोकसंख्या आधारावर आरक्षण संख्या राहणार आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सामान्य गटातूनच आरक्षणाची जागा राखीव राहणार, यात शंका नाही. त्यामुळे आजच्या या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या आरक्षण लॉटरीकडे तालुक्मयातील 623 ग्राम पंचायत सदस्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय त्यांच्या पाठीराख्यांनीही आपल्या प्रतिनिधीला अध्यक्षपद मिळावे यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे.
देवदेवतांना गाऱहाणे
आगामी पंधरा दिवसात निवडणूक आयोगाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आज जरी आरक्षण जाहीर झाले तरी पुढील पंधरा दिवस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होईतोपर्यंत तालुक्मयात मोर्चेबांधणी अथवा पळवापळवी व आमिषांना ऊत येणार आहे. काही ग्रा. पं. मध्ये दुतर्फा गट समसमान झाल्याने एकेक सदस्याला लाखोची बोली लावली जात आहे. तर अनेक ग्रा. पं. तील सदस्यांनी धर्मस्थळापासून गणपती-पुळेपर्यंत तर अनेक सदस्यांनी चौराशी देवीपासून नंदिहळ्ळी वाकडावड्ड देवीपर्यंत गाऱहाणे घालून आतापासूनच मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा सुरू आहे.
निवडणूक म्हटलं तर हारजीत आलीच पण निवडणुकीत जिंकून आलेल्या आनंदापेक्षा हरलेल्यांच्या मनातील झालेला तळपापड लवकर शमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात चुरशीच्या निवडणुकीनंतर उमेदवारांची आपल्या प्रतिस्पर्धी निवडून आलेल्या सदस्याच्या पारडय़ात अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची माळ कशी पडणार नाही यासाठी वेगळीच मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे.
14 ग्राम पंचायती महिलांसाठी राखीव
तालुक्यातील 51 ग्रा. पं. पैकी 29 ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची जागा सामान्यासाठी राहणार आहे. त्यामध्ये 14 ग्राम पंचायती महिलांसाठी राखीव राहणार आहेत. तर 14 ग्रा. पं. मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची जागा अ वर्गासाठी राखीव राहणार असून यामध्ये 7 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. तसेच ब गटासाठी 3 ग्रा. पं. च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येणार असून त्यामध्ये 2 जागा महिलांसाठी, एससी गटासाठी 3 ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येणार असून त्यामध्येही 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत. एसटी गटासाठी 2 ग्रा. पं. आरक्षित राहणार असून त्यामध्ये 1 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. तालुक्यातील 26 ग्रा. पं. वर महिला आरक्षण येणार आहे. तरीही अनेक पंचायतीवर सामान्य आरक्षण आल्यास वेगवेगळय़ा आरक्षणातून निवडून आलेल्या पुरुष मंडळींसह महिलांनाही याकरिता निवडणुकीत भाग घेता येणार आहे. त्यामुळे 51 ग्रा. पं. पैकी जवळपास 30 हून अधिक ग्रा. पं. वर महिला राज्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 30 महिन्याच्या काळासाठी होणाऱया अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जोरात रस्सीखेच सुरू आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक चुरशीची होणार
अनेक ग्रा. पं. मध्ये सामान्य गटातून अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे दावेदार असलेले सदस्य सक्रिय राजकारणी आहेत. त्यामुळे या गटात आलेल्या आरक्षणातील ग्रा. पं. मध्ये गटबाजी करुन वर्चस्व साध्य करण्यासाठी पैशांची आमिषे तसेच बळजबरी करुन आपल्या बाजूने कल दाखवण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. सामान्य गटातील अध्यक्ष पदासाठी आलेल्या आरक्षणामध्ये किती ग्रा. पं. वर भाजप व समितीचे वर्चस्व राहणार, याकडे लक्ष लागले आहे. सामान्य महिलासह, इतर महिला आरक्षण आलेल्या ग्रा. पं. वर सरकारी जावयांचा वरचष्मा राहणार आहे. निवडून आलेल्या अनेक महिला राजकारणाशी निगडित असलेल्या पती राजांच्या जीवावरच आल्या आहेत. त्यामुळे अनेक राजकारणी आपल्या पत्नीला, आईला किंवा भावजयीना अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे दावेदार बनवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची ही निवडणूक चुरशीची होणार आहे.