आ. अंजली निंबाळकर यांची सहकुटुंब पायी वारी
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूरच्या आमदार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी रविवारी सहकुटुंब भीमगडावर पायी चालत जाऊन भीमगडेश्वर श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. खानापूर तालुका आजपर्यंत कोरोनामुक्त ठेवल्याबद्दल ईश्वराची करुण भाकली. तसेच इथून पुढेही तालुक्मयातील जनतेवर अशीच कृपा रहावी, असे साकडे घातले.
गव्हाळी फॉरेस्ट नाक्मयापासून घनदाट जंगलातील साडेआठ किलोमीटरचे दुर्गम डोंगरी अंतर चालत जाऊन त्यांनी श्री भीमगडेश्वराचे दर्शन घेतले. तेथून परतताना कृष्णापूरच्या म्हादई नदीपर्यंत त्या चालत आल्या. एकूण साडेचौदा किलोमीटरची पायपीट अवघड अशा पाऊलवाटेने करावी लागली. 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांच्या कारवायांवर वचक बसविण्यासाठी आपल्या दक्षिण स्वारीच्यावेळी हा अभेद्य भीमगड बांधला होता.
या पायीवारीत आमदार अंजली यांना पती आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर, दहा वषीय मुलगी रखमा, पुत्र मल्हार यांनी साथ दिली. आपापल्या परीने सर्वजण कोरोनाविरुद्धच्या लढाईत सामील आहेतच. पण मानवी क्षमतांच्या पलीकडे असलेली एक अद्भूत शक्ती म्हणजे ईश्वर. अशा वैश्विक महामारीच्यावेळी आधारासाठी त्याच्याकडे जायचे नाही तर कोणाकडे जायचे? या भावनेतून सहकुटुंब भीमगडेश्वराला साकडे घातल्याचे डॉ. अंजलीताई यांनी सांगितले. यावेळी मल्हार निंबाळकर यांनी कृष्णापूर, तळेवाडी या गावात व फॉरेस्ट गार्डनाही धान्याचे किट व मास्कचे वाटप केले.