खानापूर/ वार्ताहर –
खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी घरफोडय़ा करून जवळपास 133 ग्रॅम सोने व व 40 ग्राम चांदीचा ऐवज जप्त करून तीन चोरटय़ांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे व त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे या प्रकरणी अटक केलेल्या मध्ये बेळगाव परिसरातील तीन चोरटय़ांचा समावेश असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली एक मोटर सायकल व मोबाईल तसेच सोने चांदी असे एकूण 7 लाख 80 हजाराचे ऐवज जप्त केले आहे चोरटय़ांनी खानापूर तालुक्मयात अनेक ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडय़ा केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत पोलिसांनी या प्रकरणी अजूनही कसून तपास हाती घेतला आहे याप्रकरणी अटक केलेल्या मध्ये अब्दुलगनी शब्बीर शेख वय 21 राहणार, पहिला क्रॉस आंबेडकर नगर अनगोळ बेळगाव , जावेद इलियास भेंडीगिरी वय 24 दुसरा क्रॉस बाबले गल्ली अनगोळ, सलीम मुक्तमसाब बसापुर वय 31 जय कॉलनी उदमबाग बेळगाव अशी त्या आरोपींची नावे आहेत त्यांच्यावर चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बैलहोंगल विभागाचे डीएसपी करूनाकरण शेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक एस एम कारजोळ, पोलीस उप निरीक्षक बसवराज पाटील, यासह पोलीस कर्मचारी शिवकुमार बल्लारी, सतीश मांग, सुरेश कुंभी शिव तुरमुरी, नन्नाखान , मुल्ला यासह पोलीस कर्मचाऱयांनी विशेष परिश्रम घेतले