कणकुंबी / वार्ताहर
खानापूर तालुका विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा उत्साहात झाली. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. ए. बी. पुंडलिक यांच्या हस्ते मराठी विज्ञान मंचने तयार केलेल्या प्रश्नपेटी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान मंचचे अध्यक्ष एस. एन. बेडरे होते.
श्री चांगळेश्वरी शिक्षणसंस्था संचलित गणेबैल हायस्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. ए. बी. पुंडलिक, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, क्षेत्रसंपन्नमूल केंद्र प्रमुख ए. आर. आंबगी, शिक्षण संयोजिका श्रीमती क्रांती पाटील, शंकर कम्मार, नोडल अधिकारी म्हणून जांबोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर, विज्ञान मंचचे उपाध्यक्ष, आनंदगड विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एम. देसाई, सचिव संजीव वाटूपकर आदी व्यासपीठावर होते.
यावेळी डॉ. ए. बी. पुंडलिक म्हणाले, तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विज्ञान शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कृती आधारित मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांची सर्जनशिलता वाढीस लागते. याचा विचार करुन शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल घडविला पाहिजे.
गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी म्हणाले, गतवर्षीच्या शैक्षणिक निकालाचे विश्लेषण करुन त्यातील त्रुटी भरुन काढण्यासाठी शिक्षकानी सुक्ष्मकृती आराखडा तयार केला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता व मानसिकता याचा विचार करुन त्यांना विविध शैक्षणिक तंत्राचा वापर केला पाहिजे, आतापासून नियोजनबद्ध कामकाजाला सुरवात केल्यास चांगल्या निकालाचे उद्दिष्ठ पूर्ण करता येते.
प्रारंभी सहशिक्षिका श्रीमती उषा पाटील यांनी ईशस्तवन केले. डॉ. ए. बी. पुंडलिक यांनी दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन केले. लक्ष्मण यकुंडी यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. येळळूरकर यांनी पुष्पगुच्छ देवून उपस्थितांचे स्वागत केले. सहशिक्षक यु. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
दुसऱया सत्रात शिक्षण संयोजिका श्रीमती क्रांती पाटील, एस. एन. बेडरे, उपाध्यक्ष एन. एम. देसाई यांनी विज्ञान विषय निकाल वाढीसंदर्भात मार्गदर्शन पेले. दुपारच्या सत्रात दहावीच्या पाठय़ क्रमावर आधारित चर्चा करुन प्रश्नमाला तयार करण्यात आली. संजीव वाटुपकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.