वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुका श्रीराम सेना हिंदुस्थानच्या अध्यक्षपदी पुंडलिक मुतगेकर (ओत्तोsली ) यांची निवड करण्यात आली. रविवारी बेळगाव येथील साई भवन जुने बेळगाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचा मेळावा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खानापूर तालुका श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुखपदी पुंडलिक मुतगेकर यांच्या नावाची घोषणा श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांनी केली.
खानापूर तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून श्रीराम सेना हिंदुस्थान संघटना बळकट असतानाही संघटनेचे नेतृत्व घोषित केले नव्हते. खानापूर तालुक्मयाच्या तळागाळात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अनेक कार्यकर्ते आहेत. पुंडलिक मुतगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तालुक्मयातील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी खानापूर येथील शिवस्मारक आवारात छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला अभिवादन केले.
यावेळी कार्यकर्ते गोविंद पाटील, बरगाव, जयदेव अंबाजी चापगाव, संदीप शेमले खानापूर, शंकर रामनीचे, सदानंद तोरगल, शुभम पाटील, रवी गुरव, आप्पाजी पाटील, विलास मुतगेकर, नागराज कडोलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.