70 वर्षीय व्यक्तीचा समावेश : तालुक्यातील चौथा पॉझिटिव्ह रूग्ण
खानापूर /वार्ताहर
खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथे शनिवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे गेल्या तीन दिवसांमध्ये खानापूर व लोंढा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडल्यानंतर तालुक्मयात धास्ती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी करवीनकोप येथे एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्मयात संसर्ग पसरला होता. त्यानंतर आता एक एक करत आज ही संख्या चारवर पोहोचली आहे. चापगाव ग्रामपंचायतीतील वड्डेबैल येथील एका 70 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे शनिवारी दिसून आले आहे. त्यामुळे तालुक्मयात कोरोना पॉझिटिव्हचा वाढता कल सुरू असल्याने एकच धास्ती निर्माण झाली आहे.