शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून रायगड येथे सुवर्ण सिंहासनाची निर्मिती केली जात आहे. यासाठी खानापूर तालुक्यातून अधिकाधिक निधी जमा करणे आवश्यक आहे. सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी प्रत्येक गावातून शिवभक्तांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी खानापूर येथील बैठकीत केले.
खानापूर तालुक्यातील शिवभक्तांची नुकतीच बैठक खानापूरच्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरात पार पडली. बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधील धारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावषी विशाळगड ते पन्हाळगड अशी गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक गावात जागृती करण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.
बैठकीला बेळगाव तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, बेळगाव तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, खानापूर तालुकाप्रमुख महादेव गावडे, खानापूर शहर प्रमुख राजू परब यासह कुप्पटगिरी, हेब्बाळ, कारलगा, नंदगड, रामगुरवाडी, गर्लगुंजी, झाडनावगे, करंबळ यासह तालुक्मयातील शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.