खानापूर / प्रतिनिधी :
खानापुरात बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बुलेटिननुसार 8 कोरोनाबाधित सापडल्याने तालुक्यात कोरोनाचा फैलाव अधिकच होत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आता बाधितांचा आकडा 499 पर्यंत पोहोचला आहे.
बुधवारी सापडलेल्या कोरोना बाधितांमध्ये खानापूर शहरातील केंचापूर गल्लीतील 58 वर्षीय पुरुष व केएसआरपी रोड येथील 35 वर्षीय पुरुष तसेच हुडको कॉलनी येथील 40 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे. अशोकनगर येथील 46 वर्षीय पुरुष तसेच बैलूर येथील 26 वर्षीय महिला, दोड्डहोसूर येथील 21 वर्षीय युवक, देमिनकोप्प येथील 42 वर्षीय महिला, तसेच चापगाव येथील 49 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे.