खानापूर / वार्ताहर :
खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी 7 नव्या कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्मयातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा दीड शतक झाला आहे. सरकारी बुलेट नुसार खानापूर शहरांमध्ये गुरुवारी तिघांचा जणांना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये समादेवी गल्ली येथील दोन वर्षाच्या बालकासह मिशन कंपाउंड खानापूर येथील एक 21 वषीय महिला व एक 28 वषीय पुरुषाचा समावेश आहे तर बोगुर येथील एक 40 वषीय पुरुष, चिक्कहट्टीहोळी येथील 39 वषीय पुरुष, गंधीगवाड येथील 55 वषीय पुरुषाचा समावेश आहे एका आणखी एक जण ग्रामीण भागातील असला तरी तो मूळचा गोकाक येथील असल्याचे समजते.