खानापूर/ वार्ताहर
सर्वत्र लॉकडाऊन असताना तालुक्मयात चोरटी वाळू वाहतूक तस्करीला ऊत आला आहे. याची खानापूर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरटी वाहतूक करणाऱया तोपीनकट्टी येथील एका ट्रक्टर मालकासह ट्रक्टर ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निटूर येथे गावठी दारूभट्टी तयार करून दारू विकणाऱया दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना खानापूर पोलिसांनी अटक केली आहे.
तोपिनकट्टी येथे चोरटी वाहतूक करणारा ट्रक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक्टरमालक शंकर रामा होसुरकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तालुक्मयातील निट्टूर गावात चोरटी गावठी दारूभट्टी तयार करून दारू विकणाऱया दोघांना खानापुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आठ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी शिवाजी नामदेव हंडी (वय 40) तसेच भरमानी रामा नाईक (वय 57) या दोघांना अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे..