खानापूर : खानापूर को-आप. बँकेच्या पोटनिवडणुकीत विजय संपादन केलेले संचालक मारुती पाटील (कौंदल) यांनी तरुण भारतच्या खानापूर येथील कार्यालयात येऊन संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. यावेळी ‘तरुण भारत’ कार्यालयातर्फे पत्रकार प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते मारुती पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खानापूर भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, खानापूर कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष डी. एम. भोसले, जि. पं. चे माजी सदस्य जोतिबा रेमाणी, भाजपाचे गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, सहदेव नाईक, अनंत पाटील, पुंडलिक कोलेकर, कौंदलचे ग्रा. पं. सदस्य उदय भोसले, ग्रा. पं माजी सदस्य सतीश पाटील, बरगाव ग्रा. पं. चे सदस्य महांतेश पाटील, रवी बडगेर, प्रकाश निलजकर आदी उपस्थित होते. यावेळी मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, जोतिबा रेमाणी, अनंत पाटील आदींची मारुती पाटील यांचा गौरव करणारी भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत पत्रकार आप्पाजी पाटील यांनी केले.
Previous Articleएपीएमसीत कांदा दरात मोठी घसरण
Next Article आता लाकडी घाण्याकडे वळू लागली पावले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.