कुंभारी मातीच्या पणत्यांना परराज्यात मोठी मागणी
वार्ताहर /खानापूर
दीपावलीच्या खरेदीसाठी दिवसभर खानापूरच्या बाजारात एकच गर्दी झाली होती. विशेषतः आकाश कंदील, पणत्या, रांगोळी आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचे विशेष लक्ष होते. तसेच धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील काही सराफी दुकानात तसेच फराळ खरेदीसाठीदेखील गर्दीला ऊत आला आहे.
प्रत्येकाच्या घरोघरी लक्षवेधक दिव्यांनी निर्माण होणाऱया चैतन्याची दिवाळी अर्थात लक्ष्मीपूजन गुरुवारी आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीपासून या उत्सवाला प्रारंभ होतो. दीपावली सण म्हणजे सुगीचा सण मानला जातो. परंतु यावषी पावसाने कहर केल्याने गेल्या नवरात्रीपासून दीपावलीपर्यंत सुगीच्या तयारीला शेतकरी लागला आहे. त्यामुळे ऐन दीपावली सणात गडद वातावरण निर्माण झाल्याने सुगीला व्यत्यय आला आहे.
दीपावली सणानिमित्त उटणे लावून अभ्यंगस्नान करून या उत्सवाचे स्वागत केले जाते. धनत्रयोदशीनिमित्त अनेकांनी सुवर्णकारांच्याकडे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी वेळ दिला. अनेक सराफी पेढय़ांवर महिलांची गर्दी दिसून आली. घरोघरी दारापुढे लक्षवेधी दिव्यांची आरास गुरुवारपासून सुरू होणार आहे. गुरुवारी दीपावलीचा मुख्य दिवस आहे. त्यादिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने प्रत्येक व्यावसायिकाने आपापल्या ठिकाणी लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी पाडवा असल्याने या दिवशीही अनेक जण लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम उरकून घेतात.
बाजारपेठेत दिवाळीसाठी विविध प्रकारची फुले, मूर्ती तसेच फळांची दुकाने सजली आहेत खानापूरच्या बाजारात शुक्रवारी एकच गर्दी झाली होती. दीपावलीला लागणाऱया मातींच्या पणत्या खरेदी तसेच रांगोळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. खानापूर तालुक्मयामध्ये दीपावलीचा सण हा उत्साहात साजरा केला जातो. या सणात सुगीचे हंगाम असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दीपावली साजरी करत सुगीलाही अधिक महत्त्व देतात.
खानापुरातील पणत्यांना परप्रांतात मोठी मागणी
दिवाळीत मातीच्या पणत्यांमध्येच तेल घालून दिवे लावण्याची परंपरा आजही आपल्या देशात आहे. त्यामुळेच येथील मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. खानापूर तालुक्यात पुंभार कलाकारांचा खजिनाच आहे.
तालुक्यातील फुलेवाडीसह सिंगीनकोप, गर्लगुंजी, विश्रांतवाडी, घोटगाळी, नंदगड, गोधोळी, निट्टूर आदी गावात कुंभार व्यवसाय करणारे अनेक कुंभारिक कलाकार आहेत. पणत्यांसह मातीच्या चुली, मातीचे डेरे कुंभार कलेतील मातीच्या वस्तूंना आजही बाजारात मोठी मागणी आहे.
तालुक्यात तयार होणाऱया अनेक कलाकुसरी पणत्यांना दरवर्षी राज्यासह परप्रांतात मोठी मागणी आहे. ऑर्डरप्रमाणे पणत्यांची परप्रांतात रवानगी झाली आहे. दिवाळी सणाच्या निमिताने तालुक्यातील कुंभार शाळा गेल्या महिन्याभरापासून गजबजू लागल्या आहेत.