खानापूर आगाराच्या बेळगाव-रामनगर बसचा अनुभव
खानापूर : बेळगाव-खानापूर 25 कि. मी. चा प्रवास खानापूर आगाराच्या के. ए. 42-एफ-656 बेळगाव-रामनगर या बसने दीड तास लावला. बेळगाव-खानापूर रस्ता आता चौपदरी झालेला आहे. बेळगाव-खानापूर हे अंतर अर्धा तासात कापते. मात्र खानापूर आगाराच्या बेळगाव-रामनगर या बसचा अनुभव वेगळाच होता.
बसभाडे एक्सप्रेसचे घेण्यात येते. आणि पिरनवाडीपर्यंत थांबत-थांबत ही बस खानापूरपर्यंत येते. याबाबत चालकाला विचारले असता, आम्हाला बेळगाव स्टेशन ते खानापूर एक तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच बस सुस्थितीत नसल्याने आम्हाला 25 कि. मी. अंतर गाठण्यास एक तासाच्या वर कालावधी लागतो. हल्याळ, शिर्शी, कारवार, दांडेली, गोवा या आगाराच्या बसेस अवघ्या 25 मिनिटात खानापुरात येतात. मात्र खानापूर आगाराच्या बस सुस्थितीत नसल्याने चालक बस सावकाश आणतात. त्यांना खबरदारी घ्यावी लागते. जर बसथांबे घेत येत असतील तर एक्सप्रेसचे भाडे का आकारण्यात येते? तसेच ग्रामीण भागात फिरणाऱया बसेस सुस्थितीतल्या का देण्यात येत नाही, असा प्रश्न प्रवाशांतून व्यक्त होत आहे. तरी आगारप्रमुखांनी याबाबत योग्य ती दखल घेण्याची गरज आहे.