वार्ताहर /खानापूर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने घटस्थापनेपासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौडीची दहाव्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिर येथे भव्य अशा कार्यक्रमाने सांगता करण्यात आली, प्रथेप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता शिवस्मारक येथील शिवमुर्ती वर अभिषेक व पूजन आमदार अंजली निंबाळकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परशराम पाटील यांच्या हस्ते शिवपूजन झाल्यानंतर ध्वज पूजन करण्यात आले. यानंतर प्रेरणा मंत्र होऊन दवडीची सुरुवात झाली दवडीचा शेवटचा दिवस असल्याने दवडीमध्ये मोठय़ा प्रमाणात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते धारकरी महिला युवक युती सहभागी झाल्या होत्या दवडीच्या मार्गावर भगव्या पताका तोरणे शिवमुर्तींचे पूजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. यामुळे संपूर्ण शहर शिवमय बनले होते
पहाटेपासूनच शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता तसेच दवडीत भक्ती गीते शिव गीते पोवाडे यांच्या गायनाने वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. दौड शिवस्मारक नींगापूर गल्ली येथे आल्यावर गल्लीमध्ये ढोल ताशा पथकाने भव्य असे स्वागत केले यानंतर चव्हाटा मंदिरात आरती होऊन नींगापूर गल्लीत दौड फिरून घोडे गल्लीतून महालक्ष्मी मंदिरात आली याठीकणी आरती झाली त्यानंतर स्टेशन रोड , देसाई गल्ली, अर्बन बँक, येथून दौड महाजन खुट ये दौड चिरमुरकर गल्लीत प्रवेश झाली या ठिकाणी दवडीचे शाही स्वागत करण्यात आले चिरमुरकर गल्लीत ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले होते. पुष्पवृष्टी , फटाक्मयांच्या आतषबाजीत करून दौडीचे स्वागत करण्यात आले सुहासिनी आरती करून ध्वज पुजन करत होत्या त्यानंतर दौड ज्ञानेश्वर मंदिराजवळ आली या ठिकाणी आमदार अंजली निंबाळकर यांनी दवडीच्या सांगता समारंभात आपले विचार व्यक्त केले, यानंतर ध्येय मंत्राने दौवडीची सांगता झाली. शेवटचा दिवस असल्याने दवडीत फार मोठय़ा प्रमाणात धारकरी सहभागी झाले होते .
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने खानापूर सरकारी दवाखान्यात रोज रात्री भोजन देण्यात येते या उपक्रमात वर्षपूर्ती झाली आहे भोजन देण्याचा कार्यक्रम पुढील वर्षभर राबवण्याचा संकल्प करण्यात आला यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यावर जबाबदारी देण्यात आली. दवाखान्यातील भोजन उपक्रमाला वाढदिवस, व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने या भोजन उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.