एक लाख रुपये व आकर्षक चषकासह जेत्यांचा सन्मान, करंबळ धोंडदेव संघ स्पर्धेतील उपजेतेपदाचा मानकरी
बातमीदार /खानापूर
खानापूर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या श्री राज ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बिडी एफसीसी संघ विजेता ठरला. त्यांना एक लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. उपविजेता करंबळ धोंडदेव संघाला मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धेत 64 संघांनी भाग घेतला
होता.
या स्पर्धेतील अंतिम सामना भाजपाचे कर्नाटक राज्य रयत मोर्चा अध्यक्ष व राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या हस्ते लावण्यात आला. सुरुवातीला फलंदाजी करत करंबळ संघाने 8 षटकात 70 धावा जमविल्या. प्रतिस्पर्धी बिडी एफसीसी संघाने आकर्षक खेळी करत 5 चेंडू राखत विजय संपादन केला.
बक्षीस वितरण समारंभाला भाजपाचे नेते विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सुभाष गुळशेट्टी, पंडीत ओगले, राजाराम पाटील, सुनील मडीमणी, म. ए. समितीचे यशवंत बिरजे, महादेव घाडी, प्रल्हाद पाटील, नारायण पाटील, सतीश घाडी, दिनकर मरगाळे, पत्रकार आप्पाजी पाटील, राजू सिद्धाणी, नारायण काटगाळकर, आयोजन कमिटीचे अध्यक्ष शांताराम घाडी, आपाण्णा घाडी, शंकर बाळाराम पाटील, परशराम धबाले आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंतीम सामन्यात पंच म्हणून रामा करलेकर, महादेव सवर यांनी काम पाहिले. यावेळी क्रिकेट स्पर्धा आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून गोपाळ दळवी, उत्कृष्ट गोलंदाज मंजुनाथ पाटील, मॅन ऑफ द सिरीज उबेद दिलावर, मॅन ऑफ द मॅच मंजुनाथ पाटील यांना देऊन सत्कार करण्यात आला. सामना पाहण्यासाठी खानापूर शहर व परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.