वार्ताहर / खारेपाटण:
सातत्याने कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे गुरुवारी खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सुखनदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी 3 वाजल्यानंतर प्रशासनाच्यावतीने वाहतुकीस बंद करण्यात आला. गुरुवारी दुपारनंतर सुखनदीने रौद्र रुप धारण केले. असून पुराच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती. त्यामुळे पूल वाहतुकीस बंद करण्यात आले. याबाबतचे लेखी पत्र खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र, पोलीस निरीक्षक कणकवली, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी – सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे. पूल बंद झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.