अपघात चालकासह दोघांचा मृत्यू
खारेपाटण/ वार्ताहर-
दिनांक 22/03/2022 रोजी रात्रौ 11:20 वा. चे मानाने खारेपाटण तपासणी नाक्याचे समोर सुक नदी च्या पुला वरून भारत बेंज कंपनीची ट्रक नं.एम.एच.47-ऐ.एस.2266 कणकवली कडून रत्नागिरी कडे जात असताना खारेपाटण सुखनदीच्या पुलावरून 80 फूट खाली कोसळला सदर अपघाताचे ठिकाणी तात्काळ खारेपाटण चेक पोस्ट वरील पोलीस अंमलदार श्री उद्धव साबळे व वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थानी मदती करीता धाव घेऊन अपघातातील दोन जखमींना तात्काळ बाहेर काढुन उपचाराकरीता खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे घेवुन गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.सरस्वती कोळी यांनी त्यांना तपासुन मयत घोशित केले. मयता मधील एकाची ओळख पटली आहे.
सदर ठिकाणी तसेच डी. वाय.एस. पी विनोद कांबळे कणकवली यांनी भेट देऊन अपघातग्रस्त ठिकाणची पहाणी केली. नदी मध्ये पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ट्रक बाहेर काढण्यास आडथळा येत होता.