जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांचे पत्रक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढतो आहे. अशा परिस्थितीत बाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्हय़ातील सर्व खासगी इस्पितळांनी सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टमध्ये नोंदणी करण्याची विनंती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी खासगी इस्पितळांना केली आहे.
खासगी इस्पितळांना सोबत घेऊनच या महामारीविरुद्ध लढा द्यायचा आहे आणि तो जिंकायचा आहे. त्यामुळे बाधितांना वेळेत उपचार मिळण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हय़ातील सर्व खासगी इस्पितळांनी सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टमध्ये नोंदणी करून घ्यावी. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. http://sast.karnataka.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून खासगी इस्पितळांना नोंदणी करता येणार आहे.
नेंदणीसाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईनच्या माध्यमातूनच अनुमोदन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी http://arogya.karnataka.gov.in/sast या वेबसाईटला भेट द्यावी किंवा 1800-425-8330 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.