संग्राम काटकर / कोल्हापूर
हजारो युवक-युवती आम्हाला रोजगार नाही अशी नेहमीच ओरड करत असतात. काहीजण रोजगाराच्या शोधण्यात आणि जाहिराती पाहण्यातच दिवस घालवतात, त्यांना www.rojgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर शेकडो नोकऱया उपलब्ध आहेत हेच माहिती नाही. संकेतस्थळ भलेही जुने असले तरी त्यावर आजही औद्योगिक व फायनान्ससंबंधी असलेल्या मोठमोठÎा शेकडो कंपन्यांमधील नोकऱयांचा खजिना आहे. त्यामुळे युवक-युवतींना संगणक, मोबाईलच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन आवडीची नोकरी शोधायची आहे.
युवक रोजगारासाठी आंदोलने करत असतानाच लॉकडाऊनच्या काळात मात्र अनेकांच्या नोकऱया गेल्या हे वास्तव आहे. चांगले शिक्षण घेऊनही रोजगार नसल्याने काहींनी आत्महत्येचा तर काहींनी व्यसनाच्या मार्ग स्वीकारला आहे. हा प्रकार थांबून तरुणाईला नोकरी मिळविणे सोपे जावे यासाठी शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने एक संकेतस्थळ बनविले आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्व जिह्यातील औद्योगिक व फायनान्समधील कंपन्यांमध्ये किती नोकऱया आहेत याची माहिती अपलोड केली आहे. तसेच नवीन कंपन्यांची माहितीही अपलोड केली जाते.
दहावीपासून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतलेले सर्वजण नोकऱयांसाठी पात्र ठरू शकता. वैशिष्ठ म्हणजे बहुसंख्य कंपन्या ह्या चांगला पगार देणाऱया आहेत. त्या मिळविण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर आपली माहिती भरावी लागेल. यानंतर नोकरीसाठी ज्या कंपनीकडे ऍप्लाय केला आहे, त्या कंपनीकडून आपली माहिती पाहिली जाते. तसेच मुलाखतीला येण्याचे एसएमएद्वारे कळवलेही जाते. तेव्हा सर्व तयारीनिशी मुलाखतीला सामोरे गेल्यास नोकरीचे दारे आपल्यासाठी खुले होण्यास वेळ लागणार नाही.
नोकरीसाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी... नोकरीसाठी इच्छुक असाल तर आधी मोबाईल अथवा संगणकावर www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ खुले करा. त्यावरील एम्प्लॉयमेंट या शब्दाला क्लिक करा. ती केल्यानंतर संकेतस्थळाच्या डाव्याबाजूला जॉबसीकरला क्लिक करा. यानंतर उजव्याबाजूला रजिस्ट्रेशनसाठी एक फाईल खुली होईल. त्यात नाव, पत्ता, आधारकार्ड नंबर, मोबाईल नंबर, शिक्षण व अनुभवाची माहिती भरा. ती भरल्यांतर लगेचच एक नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल. तो खालील चौकटीत टाकून सबमिटला क्लिक करा. असे केल्यानंतर संकेतस्थळावर जाऊन कोणत्याही जिह्यातील कंपनीतील नोकरीसाठी अप्लाय या शब्दाला क्लिक केल्यास आपली सर्व माहिती संबंधीत कंपनीकडे जाईल. मग कंपनी व्यवस्थापन माहितीची शहानिशा करून एमएसएसद्वारे कंपनीचा पत्ता व मुलाखतीची वेळ पाठवते. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.