प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ातील खासगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिकच्या नूतन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले. जिल्हा मान्यताप्राप्त प्राथमिक शिक्षक-शिक्षकेत्तर महासंघाच्यावतीने नूतन शिक्षणाधिकाऱयांचे शाल, श्रीफळ, विज्ञान दिनदर्शिका व पुस्तके देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, कार्याध्यक्ष सुनील बुधावले, सहसचिव संदीप म्हस्के, संघटन मंत्री सतीश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष शरद फडतरे, कार्यकारणी सदस्य भास्कर थोरात, सोमनाथ जाधव, धनंजय भोसले, हेमंत कुंभार, अल्पना पालकर, घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी यांनी महासंघाच्या कार्याची माहिती घेतली. तसेच मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत. कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान व कामकाज सुधारावे, जिल्हय़ातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाला नेहमी सहकार्य राहील, असे आश्वासन ही शबनम मुजावर यांनी यावेळी दिले.