बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान राज्यामधील शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी बेड आरक्षित करण्याची यंत्रणा पुन्हा सुरू केली आहे. या आठवड्यापासून सरकारी कोट्यातील कोरोना रूग्णांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान बृह बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत सांगितले. त्यांनी कोरोना प्रकरणांची संख्या वाढल्यास राखीव बेडचे प्रमाणही वाढविण्यात येईल, असे म्हंटले आहे.
आयुक्त प्रसाद यांनी गेल्या वर्षी कोरोनाचे प्रमाण सर्वधिक असताना खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के बेड सरकारी राखीव ठेवले होते. नंतर, प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे सर्व रूग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.आयुक्त प्रसाद यांनी, डिसेंबरमधील सरासरी कोरोनाचे प्रमाण ६०० होते जे जानेवारीत ३३३ आणि फेब्रुवारीमध्ये २४३ होते. तथापि, ती मार्चमध्ये १५०० पर्यंत वाढली. परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयांची मदत घेणे आवश्यक झाले आहे.