सातारा / प्रतिनिधी
सातारा शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या ग्रेडसेपरेट या महत्वाकांक्षी कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर बांधकाम विभागाकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा प्रकल्प सातारा नगरपालिका कडे वर्ग करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता आहिरे, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, माजी उपाध्यक्ष किशोर शिंदे, दीपाली गोडसे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी शिवतीर्थ पोवई नाका येथे चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नुतनीकरण कामाची यावेळी खासदार उदयनराजे यांनी पाहणी केली