प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदार मंगला अंगडी यांचा बार असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. मंगला अंगडी यांच्या कार्यालयात जाऊन बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर वकिलांनी हा सत्कार केला.
यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी बार असोसिएशनच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देऊ, असे सांगितले. बेळगाव न्यायालयाचा विस्तार वाढला आहे. त्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबतही प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.