ऑनलाईन टीम / मुंबई :
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर (वय 58) यांचा मृहदेह मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरातील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला आहे. मृतदेहाशेजारी गुजराथी भाषेतील एक सुसाईड नोट सापडली असून, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
डेलकर हे काँग्रेस, भाजप आणि भारतीय नवशक्ति पक्षाच्या तिकीटांवर सातवेळा खासदार झाले होते. 2019 मध्ये मात्र, ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.