ऑनलाईन टीम / गोरखपुर :
गोरखपूरचे खासदार रवी किशन यांचे दिल्ली पार्लमेंटमधील कामकाज पाहणाऱ्या त्यांच्या पीए चे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती रवी किशन यांचे पीआरओ पवन दुबे यांनी दिली. ते म्हणाले 42 वर्षीय पीए खासदार रवी किशन यांचे दिल्लीतील कामकाज पाहायचे.
ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, खासदार रवी किशन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या जागतिक महामारी असलेल्या कोरोनामध्ये सावधानता हाच बचाव आहे. कोरोनाचा संसर्ग गोरखपुरमध्ये देखील वेगाने पसरत आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की, आपल्या घरीच रहा. अगदीच आवश्यक असल्यास मास्क लावून घराबाहेर पडा आणि सोशल डिस्टन्सिंग चे पालन करा.