सकाळी मारहाण, अत्याचाराचे आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न
वर्धा/प्रतिनिधी
वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी ही महिला सांगत आहे की, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे. मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते”, असं या व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ रुपाली चाकणकर यांनी शेअर केला होता. यांनतर प्रकरणात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला.
दरम्यान, वर्ध्यातील भाजप खासदार रामदास तडस यांची सून व्हिडीओमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली होती. रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना रामदास तडस आणि कुटुंबाकडून मारहाण, अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता. यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं पहायला मिळत असताना संध्याकाळी या प्रकरणात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. सकाळी आरोप करणाऱ्या पूजाने संध्याकाळी खासदार तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांच्याशी लग्न केलं आणि या सगळ्या वादावर पडदा पडला. दोघांचंही घरातच साध्या कार्यक्रमात वैदिक पद्धतीने लग्न पार पडलं. पंकज तडस आणि पूजाच्या या लग्नासोसबत वादावर पडदा पडल्याचं सांगण्यात आलं. दोघांचं याआधी रजिस्टर पद्धतीने लग्न झालं होतं. पूजाच्या व्हिडीओनंतर निर्माण झालेल्या वादानंतर घरातच पूजा आणि तडसचं लग्न लागलं. त्यामुळे सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न असा ट्विस्ट या प्रकरणात पहायला मिळाला.