बसवेश्वर सर्कल परिसरात शुकशुकाट : नागरिकांना त्रास
प्रतिनिधी/ बेळगाव
दर रविवारी भरणारा खासबागचा आठवडा बाजार या रविवारीही भरला नाही. लॉकडाऊनमुळे सलग तीन रविवार बाजार न भरल्याने खासबाग, वडगाव, शहापूर, भारतनगर, जुनेबेळगावच्या नागरिकांना आठडवडय़ाचा बाजार खरेदी करता आला नाही. सलग आठवडा बाजार बंद राहण्याची इतक्मया वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याचे या भागातील ज्ये÷ नागरिकांनी सांगितले. दर रविवारी भरणाऱया या आठवडा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनाच्या विषाणुपासून बचाव करण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच आठवडा बाजारावर बंदी घालण्यात आली आहे.
दि. 22 मार्च रोजी स्वयंघोषित संचारबंदीमुळे येथील आठवडा बाजार बंद ठेवावा लागला. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्याने दि. 29 मार्च व दि. 5 एप्रिल अशा सलग तीन रविवारी बाजार बंद ठेवावा लागला आहे. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याने पुढील रविवारी म्हणजेच 12 रोजीही हा बाजार भरणार नाही. यामुळे या भागातील असंख्य विणकर, शेतकरी, कामगार वर्ग तसेच अन्य नागरीकांनी जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी सकाळी सात पासूनच बाजारपेठेत हजेरी लावली होती. आवश्यक किराणा सामान तसेच भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी सकाळीच वडगावच्या बाजारात जाणाऱयांची संख्या वाढली होती. लॉकडाऊनच्या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून कडक करण्यात आल्याने भाजीपाला विकणाऱयांनाही परवानगी देण्यात आली नाही. यामुळे उपलब्ध असणारे साहित्य खरेदी करण्यासाठे नागरिकांची धावपळ उडाली होती.
खासबाग येथील बसवेश्वर सर्कलमध्ये दर रविवारी भरणाऱया आठवडा बाजाराची व्याप्ती वाढली आहे. बाजारात रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱया जवळजवळ सर्व वस्तू मिळत असल्याने या भागातील नागरिकांसह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, बेळगाव तसेच आसपासच्या ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असते. मात्र गेले तीन रविवार बसवेश्वर सर्कल खासबागच्या परिसरात शुकशुकाट पसरला असून सर्वत्र सामसुम झाले आहे.