विकेंड कर्फ्यूचा परिणाम : पोलिसांचा कडक बंदोबस्त
प्रतिनिधी / बेळगाव
गरिबांचा बाजार म्हणून ओळख असणाऱया खासबागच्या बाजारात प्रत्येक रविवारी तोबा गर्दी असते. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव परिसरातील नागरिक बाजारात खरेदीसाठी येतात. परंतु या रविवारी विकेंड कर्फ्यु असल्याने रविवारचा आठवडी बाजार सुनासुना दिसून आला. सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परिसरातील खेडय़ांमधून अनेक भाजी विपेत्यांसोबतच फळे, फुले, इतर साहित्यांची विक्री करण्यासाठी विपेते येत असतात. प्रत्येक रविवारी हा आठवडी बाजार भरतो. मागील वषीच्या लॉकडाऊनपासून काही महिने हा बाजार बंद ठेवण्यात आला होता. कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव परिसरातील नागरिकांना भाजीपाला व इतर साहित्य जवळच उपलब्ध होत असल्याने या बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत
असते.
मागील आठवडय़ात मोठी गर्दी
या रविवारी विकेंड कर्फ्यू असल्याने बाजाराला विश्रांती मिळाली. मागील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे नाराजी व्यक्त केली जात होती. ना मास्कचा वापर, ना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात येत असल्याची तक्रार सूज्ञ नागरिक करीत होते. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा बाजार सुरूच होता. यामुळे यापुढे तरी सामाजिक अंतर राखता येईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.