शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
उप्पार गल्ली-खासबाग येथील एक तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या वडिलांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भरत राजशेखर संकपाळ (वय 24, रा. उप्पार गल्ली-खासबाग) असे त्याचे नाव आहे. तो एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होता. दि. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता काम असल्याचे सांगून तो आपल्या घरातून बाहेर पडला होता. अद्याप घरी परतला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
5.2 फूट उंची, अंगाने सुदृढ, गहू वर्ण, गोल चेहरा, सरळ नाक असे त्याचे वर्णन आहे. वरील वर्णनाच्या तरुणा विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405244 या क्रमांकावर शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.