दोघा जणांना अटक, शहापूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
वड्डर छावणी खासबाग येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एकूण तिघा जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण गंगाराम जंतीनकट्टी (वय 28, रा. भारतनगर-वड्डर छावणी-खासबाग), इरण्णा मडिवाळेप्पा कांबळे (वय 37, रा. मंगाईनगर, वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. जी. मोकाशी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
वझे गल्ली, वडगाव येथील गजानन यल्लाप्पा मन्नोळकर या बुकीकडे चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याची कबुली या दोघा जणांनी दिली आहे. त्यामुळे गजाननवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 28 हजार 350 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत. पालीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.