सातारा :
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेल्या श्री. छ. उदयनराजेंना सेनेच्या चिन्हावरुन नडलेले नरेंद्र पाटील शनिवारी मध्यरात्री आमनेसामने आले. यापूर्वी आनेवाडी टोलनाका, सुरूची राडा अशा प्रकरणांवरुन नेते आमनेसामने आलेकी सातारकरांची झोप उडते.
शनिवारी रात्री उदयनराजे समोर येताच नरेंद्र पाटील महाराज…महाराज… असे ओरडत त्यांच्या गळ्यात पडले. उदयनराजेंच्या झप्पीचा आनंद त्यांना लपवता आला नाही, ही जादूची झप्पी घेताना ”आमचे साहेब” आता मुख्यमंत्री होतायत, असे नरेंद्र पाटलांनी केलेले विधान अनेकांच्या भुवया उडवत आहे.