सातारा : खासदार श्री. छ. उदयनराजे भाेसले यांच्याबाबत अवमानकारक उदगार काढल्याचा दावा करीत उदयनराजे समर्थकांनी गुरुवारी इंदापूर (जि. पुणे) येथे एका उद्याेजकाचे वाहनअडवून त्याच्या तोंडाला काळे फासत चांगलाच चोप दिला. त्यानंतर संबंधित समर्थकांनी उद्योजकावर स्थानिक पाेलीस स्टेशनला नेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान, या घटनेतील एका समर्थकावर स्थानिक पाेलिसांनी काेविड 19 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संबंधित उद्योजकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो उद्योजक उदयनराजे यांचा गुंड असा उल्लेख करीत आहे. या व्हिडिओवरून उदयनराजे समर्थकांनी इंदापुरातील संबंधित उद्योजकास रस्त्यात थांबवून त्याचे कपडे फाडले. त्यास काळे फासले. उद्योजकाची धिंड काढत त्याला पोलीसस ठाण्यात नेले. उदयनराजेंना गुंड म्हटल्याने उद्योजकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांच्या समर्थकांनी केली.