सातारा : क्षेत्रमाहुली येथे 52 वर्षाच्या इसमाने 25 ते 30 फूट खोल खड्डयालगत असलेल्या झाडाच्या मुळीला दोर बांधून गळफास घेतला होता. त्याच्या मृतदेह दोरी तुटून या खड्ड्यात पडला होता. संगमनगर पोलीस चौकीला याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री 8 वाजनेचे सुमारास ‘खिदमत ए खल्क’ ग्रुपला यासंदर्भात फोन आला. या ग्रुपने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
गळफास घेतलेला व्यक्ती दोरी तुटून अंदाजे 25 ते 30 फुट खोल खड्ड्यात पडला होता. रात्री अंधार असल्याने एक जीप खड्डयालगत लावून त्याच्या उजेडात हा मृतदेह तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. खिदमत ए खल्क ग्रुपचे आसिफ खान, पिंटु शेठ सुतार, आसिफ फरास, आरीफ खान, हाफीज मुराद, अज्जु खान, व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार या ग्रुपने तो म्रुतदेह काढुन सातारा येथे शासकीय रूग्णालयात पाठवला.