सैनिक टाकळी/प्रतिनिधी
खिद्रापूर (ता.शिरोळ) येथील एका साठ वर्षे केळी व्यापाऱ्याला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खिद्रापूर गावात एकच खळबळ उडाली आहे. यांनतर त्यांच्या संपर्कात असलेल्या अकरा नागरिकांना टेस्ट करण्यासाठी रात्री उशिरा रुग्णवाहिकेतून नेण्यात आले आहे.
अतिदक्षता म्हणून खिद्रापूर ग्रामपंचायतीने तेथील भाग सील केला आहे. सदर व्यक्तीच्या पत्नीने सैनिक टाकळी, राजापूर, राजापूर वाडी येथे फिरून केळी विक्री केली आहे, त्यामुळे येथील लोकांनी धास्ती घेतली आहे.