विशाल भारद्वाज यांचा चित्रपट
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने स्वतःच्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री तब्बू आणि चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांची जोडी हिट मानली जाते. दोघांनी ‘मकबूल’ आणि ‘हैदर’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. विशाल यांनी तब्बूची स्वतःच्या आगामी चित्रपटासाठी निवड केली आहे.
‘खुफिया’ या चित्रपटात तब्बूसोबत अली फजल झळकणार आहे. या चित्रपटाची कथा रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) शी निगडित असल्याचे समजते. निर्मात्यांनी चित्रिकरणासाठी मसुरीतील ठिकाणांची निवड केली आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे.
विशाल भारद्वाज यांनी 2018 मध्ये ‘पटाखा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर त्यांचे पुत्र आसमान ‘कुत्ते’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. या चित्रपटातही तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तब्बू यापूर्वी बीबीसी सीरिज ‘ए सूटेबल बॉय’मध्ये दिसून आली होती. तर ‘भूलभुलैया 2’ चित्रपटात ती काम करत आहे.