प्रतिनिधी/ खेड
शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या तालुक्यातील मुंबके येथील महिलेची पर्स लांबवून त्यातील एटीएमद्वारे 44 हजार रूपये लंपास करणाऱया अज्ञात चोरटय़ावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबके येथील शगुप्ता अंतुले खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या. अज्ञात चोरटय़ाने त्यांची पर्स चोरून त्यातील एटीएम कार्डवर असलेल्या कोडचा वापर करत 44 हजार रूपये लंपास केले. ही बाब अंतुले यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली.