प्रतिनिधी/ खेड
शहरातील तीनबत्तीनाका येथील एका दुकानात गुटखा विक्री होत असल्याची कुणकुण लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक धाड टाकत पावणे दोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. या धाडीतील गुटखा येथील पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अन्न व औषध प्रशासनास या बाबत कळवण्यात आले असून यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे कळते. या कारवाईने लपूनछपून गुटखा विकणाऱया व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा विकण्यास मनाई असतानाही काही ठिकाणी गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुकानातून गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अचानक दुकानावर धाड टाकत लाखो रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
अचानक झालेल्या या कारवाईने गुटखा विकणाऱया व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची मोजणी सुरू होती. पावणे दोन लाखाहून अधिक रूपये किंमतीचा जप्त करण्यात आलेल्या गुटखाप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग नेमकी कोणती कारवाई करते, याकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे.