प्रतिनिधी/ खेड
शहरातील एक सामाजिक कार्य संघटनेच्या वतीने शहरातील महाडनाका येथील गोळीबार मैदानात आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रहिम सहीबोले, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, बावा खेडेकर, सुरेश खेडेकर, बाळा शिंदे, प्रदिप भोसले, पराग गमरे यांच्यासह एक सामाजिक कार्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 2 जानेवारीपर्यंत खेळवण्यात येणाऱया स्पर्धेत राज्यातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर गावपातळीवरील संघ खेळवण्यात आले.
1 जानेवारी रोजी गावपातळीवरील व 2 जानेवारी रोजी राज्यातील सहभागी संघांचे सामने खेळवण्यात येणार आहेत. विजेत्या संघास 30,130 रूपये, उपविजेत्यास 20,130 रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी रहीम सहीबोले, सतिश कदम, स्वप्नील कदम, पराग गमरे, राहुल रूके, पंकज कदम आदी प्रयत्नशील आहेत.
कळंबणीच्या मनाली जाधवची महाराष्ट्र किक्रेट संघात निवड