सकाळपासून मतदारांनी दाखवली नाराजी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यीतल खेड, उफळी, गोजेगाव, खिंडवाडी, चिंचणेर संमत निंब, संभाजीनगर या ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी सकाळपासून सुरु होती. मतदानांवर बहुतांशी मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याने मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. दोन्ही पॅनेलचे स्थानिक नेते मतदारांना बाहेर काढून मतदानांसाठी आणत होते.
सातारा तालुक्यातील खेडसह संभाजीनगर, उफळी, गोजेगाव, खिंडवाडी, उफळी या ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. खेड येथे सकाळपासून मतदानाकरता मतदान केंद्रावर तुरळक प्रमाण दिसत होते. मतदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र दिसत होते. या ग्रामपंचायतीसाठी आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या दोन्ही पॅनेलवर मतदार नाराज असल्याचे दिसत होते. दोन्ही पॅनेलमधील उमेदवार हे पूर्वी एकाच पॅनेलमध्ये होते नवे असे काही नाही. त्यामुळे राजकारणी मंडळी राजकारणासाठी कधी एक होतील आणि कधी भांडतील हे या निवडणूकीवरुन दिसत आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त दिसत होता. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱया अधिकाऱयांनी चांगले काम केले. सायंकाळी काहीशी गर्दी झाली होती. उद्या मतदानाच्या आकडेवारी वाढली सुमारे 60 टक्के मतदान झाले. दरम्यान, उद्या रविवारी सकाळी तहसील कार्यालयात पार पडणार आहे, असे सांगण्यात आले.
खेडसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत
खेडसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 7 हजार 51 महिलांनी तर 7 हजार 898 पुरुषांनी असे14 हजार 949 मतदारांनी मतदान केले होते.57.20 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. पुढची आकडेवारी मिळू शकली नाही.